Tuesday, July 10, 2012
शब्दांच्या पलीकडील आई.....
आलो जन्माला फक्त बिछाना ओला करण्याची बुद्धी घेऊन,
नऊ महिने वाहिलं माझ ओझं स्वतःला विसरून,
स्वतःला हवं ते मागण्याची हुशारी मीच माझ्यात निर्माण केली,
दुसऱ्याला न मागता देण्याची कला तिनेच शिकवली,
वाढत होतो शरीराने पण माणूस म्हणून वाढण्यात तिचीच मेहनत आहे,
रडताना शांत सगळेच करतात पण रडताना आलेल्या हसण्यात तीच आहे,
दुःखाच्या ढगांची दाटी झाली कि सुखाची सर बनून यायची,
कितीही बरसली तरी माझी होडी किनार्यालाही तीच आणायची,
रिकाम्या ताटात तिचा चेहरा आणि रिकाम्या पोटात तिने भरवलेला घास आजही आठवतो,
भरले डोळे कधी कि रुमाल सोडून तिच्या कुशीत शिरण्यास तरसतो,
तिला हसताना बघून मीही मनात हसतो,
नेहमी अशीच हसत राहावी हे स्वप्नं रोज बघतो,
तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या कि मनात दुःखाचा पूर येतो,
एकदा स्वचंदी हसली कि आपण सगळ्या व्यापातून दूर होतो,
जगणं सगळेच शिकतात पण जगण्याच कारण तिने शिकवलं,
किती जगावं ह्यापेक्षा कसं जगावं हे तिनेच समजावलं,
सरळ रस्त्याने वाकडे चाललो कि वाकड्या रस्त्याने सरळ चालण्याची दीक्षा मिळते,
तरीही तिच्या न कळत वाकड्यात शिरलो कि मग शिक्षाही मिळते,
मायेचा धबधबा असकाही वाहतोय कि कधी तहान तोंडी नाही,
सुखाचा मार्ग असकाही गवसलाय कि कसलीही कोंडी नाही,
ती नेहमी पाठीशी असल्याची नाही तर नेहमी बरोबर असल्याची खात्री आहे,
आणि ह्या एक विचारानेच माझी आणि सुखाची मैत्री आहे.
Subscribe to:
Comments (Atom)